Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

आयात शुल्कातील वाढ आणि जागतिक बाजारातील चढ-उतारांमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

नितीन कुलकर्णी
19 May 2026, 11:00 PM
11,163 वाचले
News Image

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, आयात शुल्कामध्ये झालेली वाढ तसेच मागणी-पुरवठ्यातील असंतुलन याचा थेट परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत आहे.

चांदीच्या दरात आज तब्बल 8 हजार रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह चांदीचा दर ₹2,79,000 प्रति किलोवर पोहोचला आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्येही बाजारातील तेजीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

त्याचप्रमाणे सोन्याच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा दर जीएसटीसह ₹1,61,000 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास गेला आहे. सतत बदलणाऱ्या दरांमुळे सराफा बाजारात अस्थिरता कायम असल्याचे दिसून येत आहे.

बाजार तज्ज्ञांच्या मते, आयात शुल्कामध्ये वाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतींवर दबाव निर्माण झाला आहे. तसेच जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि डॉलरच्या तुलनेतील चढ-उतार यांचाही परिणाम दरांवर होत आहे.

मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार दिसत असून, आजची वाढ ही त्याच ट्रेंडचा भाग असल्याचे मानले जात आहे. लग्नसराईच्या काळात दर वाढल्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

सराफा बाजारात सध्या सावधगिरीचे वातावरण असून, पुढील काही दिवसांत दर स्थिर होतील की आणखी वाढतील याकडे सर्वांचे लक्ष वेधल आहे.