ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा
५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी, उकाड्यातून दिलासा
सुमारे ५० दिवसांच्या प्रदीर्घ खंडानंतर बुधवारी मराठवाड्यातील विविध भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली. हिंगोली, जालना, नांदेड, धाराशिवसह अनेक भागांत हलक्या ते मुसळधार सरी बरसल्या. वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीला वेग; अनेक पॅनलची तयारी, सुनेत्रावहिनी पवारांच्या नेतृत्वाकडे लक्ष
बारामतीच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय गटांकडून पॅनल उभारणीची तयारी सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटासह युगेंद्र पवार, भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनही हालचाली सुरू असल्याने निवडणुकीचे चित्र चर्चेत आले आहे.
सातारा-लोणंद मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी; वाढे-वडूथ पुलांमुळे पर्यायी मार्गाने वाहतूक
सातारा-लोणंद मार्गावरील वाढे आणि वडूथ येथील जुन्या पुलांवरून अवजड वाहनांची वाहतूक २८ सप्टेंबर २०२६ पासून बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक व्यवस्था २० जून २०२७ पर्यंत लागू राहणार असून अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
कसारा मार्गावर १५ डब्यांची लोकल लवकरच; टिटवाळा फलाट विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात
कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. टिटवाळा स्थानकात १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक रुळ, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरची कामे पूर्ण झाली असून आता फलाट विस्ताराचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
२१ जागांसाठी इच्छुकांची गर्दी; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींच्या उपस्थितीत मुलाखती, जयदादांचाही सहभाग
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बारामतीतील राष्ट्रवादी भवनात पार पडल्या. सुनेत्रा पवार यांनी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील कामाचा आढावा घेतला. यावेळी जय पवार यांचीही उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार
शाळा सोडल्यानंतर शाळेच्या रेकॉर्डमध्ये किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात झालेली चूक दुरुस्त करता येत नाही, असा गैरसमज अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थी शाळा सोडून गेला आहे, केवळ या कारणावरून दुरुस्तीचा अर्ज नाकारता येणार नाही. मात्र संबंधित नोंद चुकीची असल्याचे पुराव्यांसह सिद्ध होणे आवश्यक आहे.