बारामती शहर आणि परिसरात झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वाहतुकीवर परिणाम झाला आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच जयदादा पवार यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागांकडे धाव घेत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
बारामती-भिगवण मार्गासह विविध भागांमध्ये पडलेल्या झाडांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रस्ते वाहतुकीसाठी तातडीने खुले करावेत, पडलेली झाडे हटवावीत आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
जयदादा पवार यांच्या या तत्परतेतून बारामतीच्या जनतेप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा दिसून आली. संकटाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेणे आणि प्रशासनाला तत्काळ सूचना देणे ही कार्यशैली बारामतीकरांसाठी नवी नाही. जनतेच्या अडचणींमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची परंपरा या भागात अनेक वर्षांपासून पाहायला मिळते.
बारामतीच्या विकास प्रवासात लोकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या समस्या समजून घेण्याची परंपरा निर्माण झाली आहे. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत जयदादा पवार यांनीही संकटग्रस्त भागांची पाहणी करत नुकसान कमी करण्यासाठी आणि परिस्थिती सुरळीत करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी पडलेल्या झाडांचे केवळ हटविणेच नव्हे तर त्याठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करून हरित संपदा वाढविण्याचाही मुद्दा त्यांनी प्रशासनासमोर मांडला. पर्यावरण संवर्धन आणि विकास यांचा समतोल राखत काम करण्यावर त्यांनी भर दिला.
वादळामुळे प्रभावित झालेल्या भागांतील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. प्रशासनाने समन्वयाने काम करून नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर सुरळीत करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
बारामतीत निर्माण झालेल्या या परिस्थितीत जनतेच्या मदतीसाठी पुढाकार घेत जयदादा पवार यांनी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी कृतीतून अधोरेखित केल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.