Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

पुण्यात सुरक्षा अलर्ट! सारसबाग आणि गणपती मंदिर दोन दिवसांसाठी बंद

सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग आणि तळ्यातील गणपती मंदिर २ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नितीन कुलकर्णी
27 May 2026, 04:40 PM
10,988 वाचले
News Image

पुण्यातील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असलेली सारसबाग आता दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या तळ्यातील गणपती मंदिराचे दरवाजेही बंद राहणार असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणतीही जोखीम न घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून परिसरात विशेष तपासणी आणि नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सारसबाग परिसरात रोज हजारो नागरिक भेट देतात. त्यामुळे सुरक्षेचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही तात्पुरती बंदी लागू केली आहे.