Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

जनतेचा विश्वास, विकासाची परंपरा; जयदादा जपतायेत अजितदादांचा लोकाभिमुख वारसा

बारामतीतील जयदादा यांच्या जनता दरबारातून नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर कार्यवाही केली जात आहे. जनतेशी संवाद आणि विकासकामांवरील भरातून अजितदादांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

नितीन कुलकर्णी
14 Jun 2026, 08:54 AM
12,924 वाचले
News Image

दिवंगत अजितदादांनी आपल्या राजकीय प्रवासात जनतेशी थेट संवाद आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीला सर्वोच्च प्राधान्य दिले. सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेणे, प्रशासनाशी समन्वय साधून त्यांचे निराकरण करणे आणि विकासकामांना गती देणे हीच त्यांची खरी ओळख होती. आज त्यांच्या पश्चात तोच वारसा कृतीतून जपण्याचे काम सुनेत्राताई पवार आणि जयदादा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबईत सुनेत्राताई पवार यांच्या जनता दरबारात राज्याच्या विविध भागांतून आलेले नागरिक आपल्या समस्या मांडत आहेत. शासकीय योजनांपासून वैयक्तिक अडचणींपर्यंत विविध विषयांवर त्या थेट संवाद साधत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देत आहेत. जनतेशी असलेला हा थेट संपर्क अजितदादांच्या लोकाभिमुख कार्यशैलीची आठवण करून देणारा ठरत आहे.

दुसरीकडे बारामतीत जयदादा यांनीही जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांशी संवादाचे दालन खुले ठेवले आहे. गावागावांतून येणारे शेतकरी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते आपल्या समस्या थेट मांडत असून त्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासकामांचा सातत्याने आढावा, नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य आणि लोकांमध्ये राहून काम करण्याची पद्धत यामुळे जयदादांमध्ये अजितदादांच्या कार्यशैलीची झलक पाहायला मिळत असल्याची भावना अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

अजितदादांनी आयुष्यभर जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. विकासकामे, सिंचन, उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांत त्यांनी घेतलेले निर्णय आजही राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा भाग मानले जातात. जनतेसाठी झटणे आणि कामातूनच उत्तर देणे ही त्यांची कार्यसंस्कृती होती.

आज सुनेत्राताई पवार संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत जनतेच्या समस्या समजून घेण्यावर भर देत आहेत, तर जयदादा स्थानिक पातळीवर विकासकामे आणि लोकसंपर्काच्या माध्यमातून त्या विचारांना पुढे नेत आहेत. त्यामुळे जनतेशी जोडलेले राहणे, त्यांच्या अपेक्षा समजून घेणे आणि विकासाचा वेग कायम ठेवणे हीच अजितदादांना खरी आदरांजली असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.

जनतेसाठी काम करण्याची तळमळ, विकासासाठीची धडपड आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास हा अजितदादांचा वारसा आज सुनेत्राताई आणि जयदादांच्या कामातून पुढे जात असल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे.