Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

एफडीएच्या भिवंडीतील छाप्यात मुदतबाह्य माल जप्त; ११ जणांवर गुन्हा

विक्रीस अयोग्य खाद्यपदार्थांची योग्य विल्हेवाट न लावता ते पुन्हा बाजारात आणण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय एफडीएला आहे. तपासणीत ३३ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नितीन कुलकर्णी
18 Oct 2026, 11:42 AM
10,799 वाचले
News Image

मुदतबाह्य आणि खराब खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते पुन्हा विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा संशय अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) व्यक्त केला आहे. भिवंडीतील तपासणीत ३३ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एफडीएच्या पथकांनी १४ आणि १५ ऑक्टोबरला दुकाने, गोदामे आणि खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावणाऱ्या केंद्रांची तपासणी केली. गुलजार नगरमधील डिस्काउंट स्टोअरमध्ये मुदतबाह्य, खराब आणि गळती असलेले १८ प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आढळले. या मालाची किंमत ८० हजार ५७५ रुपये होती. दुकानाकडे अन्न व्यवसायाचा परवाना आणि खरेदीची आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही तपासणीत समोर आले.

यानंतर संबंधित पुरवठादाराच्या जागेची तपासणी करण्यात आली. तेथे २३ प्रकारचे मुदतबाह्य किंवा खराब खाद्यपदार्थ आढळले. त्यांची किंमत ८६ हजार ८२५ रुपये असल्याचे एफडीएने नमूद केले आहे. काही ठिकाणी पॅकेजिंग खराब झालेले आणि उंदरांनी कुरतडलेले खाद्यपदार्थही आढळले.