Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

अजय देवगण यांच्या जुहूतील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई

जुहूतील कपोले को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील अजय देवगण यांच्या बंगल्यात परवानगीशिवाय बदल केल्याचा आरोप आहे. कागदपत्रे सादर न झाल्याने मुंबई महापालिकेने बांधकामावर कारवाई केली.

नितीन कुलकर्णी
18 Oct 2026, 06:20 PM
11,139 वाचले
News Image

अभिनेता अजय देवगण यांच्या जुहू येथील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. कपोले को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी परिसरातील या मालमत्तेत आवश्यक परवानग्यांशिवाय काही बदल करण्यात आल्याचा आरोप आहे.

महापालिकेच्या के-पश्चिम विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३५४-अ अंतर्गत काम थांबवण्याची नोटीस बजावली होती. बांधकामासंबंधी आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर करण्यास सांगण्यात आले होते.

मालकांकडून सादर करण्यात आलेल्या उत्तरात बांधकाम अधिकृत असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे नसल्याचे महापालिकेने नमूद केले. त्यानंतर पालिकेने बंगल्यातील काही भागांवर कारवाई केली. ही मालमत्ता अजय देवगण आणि त्यांच्या आई वीणा देवगण यांच्या मालकीची असल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणामुळे बंगल्यात सुरू असलेल्या कामाबरोबरच त्याच्या वापरावरूनही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महापालिकेची कारवाई कथित अनधिकृत बांधकामासंदर्भात असून, संबंधित परवानग्या आणि कागदपत्रांबाबत पुढील कार्यवाही काय होते, याकडे लक्ष लागले आहे.