अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांनी महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख जगभरात पोहोचवण्यासाठी एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या सजावटीत थेट पुण्यातील ऐतिहासिक 'शनिवारवाड्याची भव्य प्रतिकृती' साकारण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, लेझर वूड कटरच्या साहाय्याने तयार केलेल्या एका छोट्याशा मॉडेलपासून सुरू झालेली ही कल्पक कल्पना पुढे संपूर्ण मंदिर परिसर उजळवून टाकणाऱ्या एका देखण्या, भव्य सजावटीमध्ये रूपांतरित झाली. सात समुद्रांपार राहूनही आपल्या मायभूमीच्या मातीचा सुगंध, तिची समृद्ध संस्कृती आणि परंपरा जपण्याची किमया यानिमित्ताने अमेरिकेतील मराठी बांधवांनी साधली आहे