Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
राजकारण

राष्ट्रवादीत हालचालींना वेग; सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी मुंबईत संध्याकाळी 5 वाजता आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पक्ष संघटन मजबूत करणे, आगामी रणनीती आणि पक्षांतर्गत समन्वयावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

नितीन कुलकर्णी
20 May 2026, 10:00 AM
11,160 वाचले
News Image

राज्याच्या राजकारणात (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय रणनीती निश्चित करण्यासाठी त्यांनी आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईत आमदार व खासदारांची  महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत पक्षांतर्गत घडामोडी, संघटनात्मक बदल, मतदारसंघनिहाय आढावा तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील समन्वय वाढवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे हा या बैठकीमागील मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे.

सुनेत्राताई पवार यांनी अल्पावधीतच पक्षातील नेते आणि आमदारांशी संवाद वाढवण्यावर भर दिला असून, संघटनात्मक पातळीवर सक्रिय भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात असून, पक्षातील एकजूट आणि रणनीती अधिक मजबूत करण्यासाठी यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.