Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
राजकारण

सामान्यांच्या प्रश्नांवर थेट संवाद, सुनेत्राताईंचा सकारात्मक पुढाकार

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध प्रशासकीय व स्थानिक प्रश्नांवर संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचे आश्वासन देण्यात आले.

नितीन कुलकर्णी
19 May 2026, 09:57 PM
11,874 वाचले
News Image

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शासकीय कामकाजातून वेळ काढून पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला.

या बैठकीत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या स्थानिक समस्या, प्रलंबित कामे आणि प्रशासकीय अडचणी मांडल्या. यामध्ये विविध समस्या, शासकीय कागदपत्रांतील अडचणी, महसूल विभागाशी संबंधित प्रकरणे, तसेच विविध सामाजिक व नागरी प्रश्नांचा समावेश होता.

अनेक कार्यकर्त्यांनीही आपल्या परिसरातील संघटनात्मक अडचणी आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत माहिती दिली. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीदरम्यान काही महत्त्वाच्या आणि तातडीच्या स्वरूपाच्या प्रश्नांवर तत्काळ चर्चा करण्यात आली, तर उर्वरित प्रकरणे संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींची स्वतंत्र नोंद घेऊन त्यावर नियमित पाठपुरावा करण्याचे आदेश दिले व सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर योग्य पद्धतीने निराकरण केले जाईल, असे सुनेत्राताईंनी आश्वासन दिले.

या  बैठकीत नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर विशेष भर देण्यात आला. लोकांच्या समस्या समजून घेणे, त्यावर प्रशासनाशी समन्वय साधणे आणि शक्य तितक्या लवकर तोडगा काढणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

राजकीय आणि शासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना जनतेशी संपर्क अधिक मजबूत ठेवण्यावर भर देत असल्याचे या भेटीतून दिसून आले. पक्ष कार्यालयात झालेल्या या संवादामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांना आपले प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाली आणि प्रशासनाशी जोडणी अधिक प्रभावी झाल्याचे चित्र दिसून आले.